जळगाव जिल्हा

आयुक्तांच्या अविश्वास ठरावाला भाजपाचा विरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्युज |चिन्मय जगताप | मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याविरुद्ध शिवसेनेतर्फे महासभेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र या ठरावाला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे, अशी माहिती ‘जळगाव लाईव्ह’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांचा एक निष्क्रिय कारभारामुळे जळगाव शहराचा विकास होत नाही. मिळालेल्या निधीचे कार्यादेश देखील आयुक्त काढू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विशेष महासभा बोलवत अविश्वास ठराव काढण्यात येईल अशी माहिती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगावला दिली होती. त्यावेळी ते असेही म्हणाले होते की, हा अविश्वास ठराव सर्वपक्षीय असून मनपातील सर्व नगरसेवक आयुक्तांविरोधात आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने या ठरावाला समर्थन करायचे नाही असे ठरवले आहे. अशी माहिती जळगाव लाईव्हच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

शिवसेनेने नाक दाबून तोंड उघडू नये

राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. नगर विकासमंत्री देखील शिवसेनेचा आहे. असं असताना आयुक्तांची बदली करून त्यांच्या जागी इतर कोणालाही आणले का जात नाही. शिवसेनेने ठरवले तर त्यांच्या जागी कोणतेही दुसरे कार्यक्षम आयुक्त सहज आणता येतील. मात्र शिवसेना ते न करता ‘नाक दाबून तोंड उघडण्याचा’ प्रयत्न करत आहे.

– भगत बालाणी, गटनेते भाजपा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button