⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

जळगावात भाजप पदाधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांसह आ. चंद्रकांत पाटीलांविरोधात उपोषण; नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । राज्यात महायुतीचे सरकार असले तरी जळगावात भाजपच्या पदाधिकाऱ्याने जमिनीच्या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.

नेमकं प्रकरण काय?
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक 197/2/2 आहे. त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी अभिन्यास मंजूर केलाय. पण शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती दिलीय.

याच्या विरोधात माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. एक शेतकरी महिला म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोपही माधुरी अत्तरदे यांनी केलाय.