---Advertisement---
राजकारण

फडणवीसांच्या कोथळी भेटीविषयी खा.रक्षा खडसेंचा मोठा खुलासा

muktainagar2
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, फडणवीस यांनी कोथळी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल खडसेंच्या सूनबाई भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

muktainagar2

फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते अशातला भाग नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळं नाथाभाऊंचही त्यांच्याशी बोलणं झालं,’ असं रक्षा खडसे म्हणाल्या.

---Advertisement---

‘मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,’ असं त्या म्हणाल्या. खडसेंच्या कोथली येथील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता रक्षा खडसे म्हणाल्या, ‘नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते. तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.’

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असा आरोप खडसे यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी खडसे सोडत नाहीत. अशा परिस्थितीत फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---