---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर राजकारण

भाजपच्या आमदार खासदारांवर पोलीस पडले भारी

mangesh chavan police
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरातील महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याला खुर्चीला बांधून ठेवले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस आ.मंगेश चव्हाण यांना अटक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. भाजपचे खासदार, जिल्हाअध्यक्ष आमदार आणि दिग्गज पदाधिकारी सोबत असतानाही पोलीस आ.चव्हाण यांना शासकीय वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. एरव्ही पोलिसांसमोर सत्ता, पद आणि विरोधी पक्षाचा आव आणणारे भाजप पदाधिकारी अटकेच्या वेळी चिडीचुप दिसून आले. अटकेनंतर मात्र भाजप नेत्यांनी भेटीगाठी आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला असला तरी पोलिसच वरचढ ठरले आहेत.

mangesh chavan police

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापल्याने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आक्रमक होत शेतकऱ्यांचा महावितरणच्या कार्यालयात पोचले होते अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची चर्चा करता करता हे दुसरीकडेच भरकटले आणि त्यांनी त्याला खुर्चीला बांधून ठेवले. शेतकऱ्यांची समस्या रास्त होती पण अधिकाऱ्याला बांधून ठेवत बच्चू कडू स्टाईलचा अवलंब करणे कितपत योग्य होते असा प्रश्न उपस्थित राहतो. आमदारांनी आंदोलन केले आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. आमदार इकडे आले आणि महावितरणचे अभियंता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

---Advertisement---

भाजप जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, खा.उन्मेष पाटील, आ.संजय सावकारे, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह दिग्गज पदाधिकारी आणि आ.मंगेश चव्हाण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून खाली उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच त्यांना पोलिसांनी गाठले आणि ताब्यात घेणार असल्याची कल्पना आ.मंगेश चव्हाण यांना दिली. आम्ही लोकप्रतिनिधी असून आमच्या वाहनाने पोलीस ठाण्यात येतो असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे गुन्हा आहे का? असे म्हणत आमदारांनी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला तोच पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी तुम्ही गुन्हा केला असून मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही दुसऱ्यांना मारहाण कराल का? तुम्ही कुणीही असले तरी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावेच लागेल असे खडेबोल चिंथा यांनी सुनावले. पोलीस निरीक्षकांनी देखील थेटपणे मी तुम्हाला अटक करायला आलो असून तुम्हाला माझ्यासोबत यावेच लागेल असे स्पष्ट केले. भाजपच्या दिग्गज नेत्यांसमोर हे सर्व घडत असताना केवळ आ.संजय सावकारे यांनी चव्हाण यांची बाजू घेत पोलिसांना जाब विचारला मात्र खा.उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे हे मात्र मूग गिळून गप्प होते.

कुणीही पुढे येऊन पोलिसांना अडवले नाही किंवा आम्ही आमच्याच वाहनाने पोलीस ठाण्यात येतो असे ठोसपणे सांगितले नाही. आमदार चव्हाण यांना पोलीस घेऊन गेल्यानंतर खासदार, आमदारांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले, निषेध मशाल मोर्चा काढला. भाजप पदाधिकाऱ्यांनी खूप काही केले तरीही त्यासमोर पोलिसांचा खाक्याच वरचढ ठरला. पोलीस प्रशासनाने कुणाच्याही दबावाला न जुमानता कारवाई केली आणि तेच हिरो ठरले.

विशेष म्हणजे पोलिसांनी आमदारांकडे पाहून पोलीस कोठडी मागण्यात देखील कसूर केला नाही. न्यायालयाला सर्व बाबी आणि घटनेचे गांभीर्य समजावून सांगत ५ दिवस कोठडी पोलिसांनी मागितली. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे.

पहा व्हिडीओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/274339857636776/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---