जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । राज्यातील २८८ नगरपालिकांसाठी २ टप्प्यात मतदान झालं. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर २० डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होतं. तर आज २१ डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 18 नगराध्यक्ष पैकी एका जागेवर भाजपने आधीच आघाडी घेतली आहे. जामनेर नगरपरिषदेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध झाल्या आहेत.

नगराध्यक्ष पदाबरोबरच भाजपचे ९ नगरसेवक पदाचे उमेदवार देखील बिनविरोध झाले आहेत. नगराध्यक्ष आणि ९ नगरसेवक बिनविरोध झालेली जिल्ह्यातील जामनेर नगरपालिका एकमेव. १७ नगरसेवक पदाच्या जागांसाठी चा निकाल आज बाहेर पडणार आहे

जिल्ह्यात सहा जागांसाठी ६३% मतदान
दरम्यान जिल्ह्यातील सहा नगरपरिषद, नगरपालिकांतील ९ प्रभागांसाठी काल शनिवारी ६३.११ टक्के मतदान झाले. यामध्ये भुसावळ ४ ब, ११ ब -५१.२९ टक्के, वरणगाव – १० अ, १० क -६९ व ४९ टक्के, पाचोरा ११ अ, १२ ब-५८.९६, ६६.७० टक्के, अमळनेर १ अ- ५८.७९ टक्के, यावल ८ ब-७७.६६ टक्के सावदा ४ ब-६८.२६ टक्के मतदान झाले.





