⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

लोकसभा निडवणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का ; ‘या’ मित्र पक्षाने सोडली साथ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, लोकसभा निडवणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. मित्र पक्षाने भाजपची आणि एनडीएची साथ सोडली आहे.

ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुनेत्र कळघम (AIADMK)ने एनडीएची साथ सोडली आहे. अण्णाद्रमुकची सोमवारी बैठक पार पडल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अण्णाद्रमुकने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

‘अण्णाद्रमुक’च्या अधिकृत हँडलसह, समर्थकांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर, ‘धन्यवाद, कृपया पुन्हा येऊ नका’ या हॅशटॅगसह अनेक संदेश पोस्ट केले आहे. ही पोस्ट म्हणजे भाजपला फटकारल्यासारखे मानले जात आहे.