गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपराने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी!

जून 21, 2025 7:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुने २०२५ । रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा येथे आज दि.२१ जून रोजी गौण खनिजांची वाहतूक करताना एका डंपराने दुचाकीला समोरुन धडक दिली असता दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती समजली. तरी सदर घटेनेचे छायाचित्र वरुन दिसून येते की,दुचाकी डंपराच्या पुढच्या टायर खाली असून संपुर्णपणे त्याचा चुराडा झाला आहे.अश्या गंभीर स्थितीमध्ये सुद्धा सदर अपघातामध्ये सुदैवानेच प्राण हाणी टळल्याचेही दिसून येते.

dp

याबाबत अधिक माहिती अशी की,गौण खनिजांची अशा वाहणाच्या मदतीने सदर मार्गावरुन सतत सुसाट वेगाने होणारी वाहतूक मुळे गावकरी आधीच त्रस्त असताना,यादरम्यान सदरचा अपघात घडतच ग्रामस्थांनी डंपर अडवले असता,डंपर चालक दारुच्या नशेत दिसून येतच घटणा स्थळी संतप्त गावकऱ्यांनी त्याला चांगलीच चोप दिल्याची बाब चर्चेतून समोर आली आहे.

Advertisements

या घटनेची माहिती मिळतच विना विलंब सावदा पोलिस ठाण्याचे पोउनि अमोल गर्जे सह पोलिस कर्मचारी आणि इतर पोलिस ठाण्यांचे पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला‌.यावेळी संतप्त जमावांच्या तीव्र भावना पोलीसांनी समजून घेत.परिणामी लोकांना शांत केले.व कारवाई साठी गौण खनिजाने भरलेले दोन डंपर सावदा पोलिस ठाण्यात आणले आहे.तरी सदर गौण खनिजांची वाहतूक व उत्खनन वैध की अवैध सध्या गुलदस्त्यात असून,या अनुषंगाने पोलीस व संबंधित महसूल विभाग काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment