ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर ; भुसावळ जवळील महामार्गावरील घटना

फेब्रुवारी 26, 2025 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्ग सहावर होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भुसावळ शहराजवळील महामार्गावर ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वराला भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

या घटनेबाबत असे की, ट्रक क्रमांक (GJ 36 T 6218) हा भुसावळकडून जळगावच्या दिशेने जात असताना रेल्वे ओव्हरब्रिज जवळील भावे गल्ली येथील राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या समोर दुचाकी अडकले आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या वाहतुकीमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

Advertisements

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment