⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

आनंदाची बातमी! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात; आता इतके पैसे मोजावे लागतील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । आज 1 जून महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक बदल झाले. त्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलिंडर 1856.50 रुपयांचा होता. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय.

जळगावात घरगुती गॅस सिलिंडरचा 1103 रुपयावर विकला जात आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली आहे. किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो. १ जूनपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर
दिल्लीत गॅस सिलिंडर 1856.50 रुपयांवरून 1773 रुपयांवर आला आहे. कोलकातामध्ये पूर्वी 1960.50 रुपयांच्या तुलनेत आता 1875.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, पूर्वी ते मुंबईत 1808.50 रुपयांना उपलब्ध होते, जे आता 1725 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये 2021.50 रुपयांवरून किंमत 1937 रुपयांवर आली आहे.