⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : कसण्यासाठी घेतले शेत, ११ एकरात लावला गांजा, पोलिसांनी टाकली धाड आणि ६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


Erandol News । जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारातील गट नंबर १२ मध्ये दिगंबर पंडीतराव पाटील व नितिन डिगंबर पाटील यांच्या सामाईक क्षेञात तूर पिकाच्या शेतात ‘गांजा, या मादक अंमली पदार्थाची लागवड केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी ११ एकर शेताच्या क्षेञातुन ८ क्विंटल ७५ किलो म्हणजेच अंदाजित किंमत ६१ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहीरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पो.हे.कॉ. अनिल पाटील, विलास पाटील, राजेश पाटील, पो.नाईक अकील मुजावर, मिलींद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलिस शिपाई पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील, रविंद्र वाघ, संतोष चौधरी यांच्या पथकाने खडकेसीम शिवारातील गट नंबर १२ मध्ये दिगंबर पंडीतराव पाटील व नितिन डिगंबर पाटील यांच्या सामाईक क्षेञात तूर पिकाच्या शेतात ‘गांजा, या मादक अंमली पदार्थाची लागवड केल्याची खाञीशिर माहीती मिळाल्यावरून अचानक धाड टाकली.

या धाडीत गट नं. २०/१ व १२ मधुन एकूण ११ एकर शेताच्या क्षेञातुन ८ क्विंटल ७५ किलो (अंदाजित किंमत – ६१ लाख २५ हजार) तसेच ७० हजार रूपये किंमतीची होंडा कंपनी सी.बी.शाईन (क्रमांक एम.पी.१०एम.वाय.६२९४) ही जप्त करण्यात आली असून असा एकूण ६१ लाख ९५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
अशी माहीती एरंडोल पोलिस स्टेशनने ४ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार रोजी राञी प्रेसनोटद्वारे दिलेली आहे.

सदर शेतमालक हे गुजरात मधील रहीवासी असून त्यांनी सदरचे शेत हे कसण्यासाठी मेरसिंह खरटे गाठीया खरटे रा. ढेढगा फाल्या, मुलवानीया कबरी, खरगोन (मध्यप्रदेश) यास दिले आहे. पोलिसांची कुणकुण लागताच सदर आरोपीने रातोरात पोबारा केला.

पोलीस हवालदार विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.