---Advertisement---
राजकारण निधन वार्ता महाराष्ट्र

मोठी बातमी : शिवसेना आमदाराचा सहपरिवार दुबईत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असून तशी एक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके हे कुटुंबासह दुबई येथे गेले होते. त्याठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आ.लटके यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून ते दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. लटके यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

mla latke jpg webp

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके हे परिवारासह दुबई येथे गेले होते.  रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे. आम्ही सध्या त्यांचे पार्थिव देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहिती समोर येत आहे. लटके यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर गर्दी करण्यास सुरवात केली आहे.

---Advertisement---

आमदार रमेश लटके हे शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवीत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती दिली. ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते. एकदा त्यांनी पोटनिवडणूक देखील लढवली होती. मातोश्रीवर एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांचा दबदबा होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---