---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

मोठी बातमी : भगवे फेटे परिधान करीत बंडखोर आमदार बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दि.२० जूनपासून एकनाथ शिंदे यांच्यासह ५० बंडखोर आमदार महाराष्ट्रच्या बाहेर होते. सुरत, अहमदाबाद, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून बंडखोर आमदार रात्री मुंबईत पोहचले. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी हॉटेलमधून भगवे फेटे घालून बाहेर पडले. एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी कुलाबा येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत अभिवादन केले.

bal thakare eknath shinde 1 jpg webp

शिवसेनेतून बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दि.२० जून रोजी एकनाथ शिंदे त्यांच्याशी इतर आमदारांनी बंडखोरी केली होती. गेल्या बारा दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार मुंबईत पोहचले आहेत. विधानमंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली असून तत्पूर्वी बंडखोर आमदारांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आहेत. यावेळी विधानसभेत सभागृहात अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

---Advertisement---

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांसाठी पक्षांनी आपापले व्हीप जारी केले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते आमचाच उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त करीत असून कामकाजाला सुरुवात झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---