जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत कळविले आहे.

शासनाच्या आदेशानुसार मनाई आदेश लागू केलेल्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम प्राप्त; लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार
- अलर्ट! १ एप्रिलपासून पैशांसंबधित अनेक नियम बदलणार, तुमच्या माहितीसाठी आताच जाणून घ्या..
- अन् विधानपरिषदेत एकनाथ खडसे संतापले ; म्हणाले..
- ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने चांदी दरात मोठी घसरण, जळगावात आताचे असे आहेत भाव?
- महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी नंबर प्लेटसाठी किती पैसे लागणार? परिवहन मंत्र्यांनी किंमतच सांगून टाकली..