---Advertisement---
कोरोना राजकारण राष्ट्रीय

मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. बुधवारीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आली होती. काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात त्या सहभागी झाल्या होत्या. शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

soniya gandhi jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना काल संध्याकाळी अर्थात बुधवारी सौम्य ताप आला होता. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचं लक्षात येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जात असून उपचार सुरु करण्यात आले आहे. तसेच ताप आल्यानंतर सोनिया गांधी तातडीने लखनौहून दिल्लीत परतल्या असल्याचे सांगितले जात आहे.

---Advertisement---

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची माहिती गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. बुधवारीच सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी ने नोटीस बजावली होती. ईडीच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्या चौकशीला देखील जाणार होत्या मात्र कोरोनाची लागण झाल्याने चौकशी होणार कि नाही? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---