⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

निवडणुकीपूर्वीच जळगावात राजकीय धमाका ; भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील तिढा सुटला असला तरी अद्यापही काही जागांसाठी चर्चा सुरु आहे. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ‘मविआ’तील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला सुटली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी मातोश्री दरबारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर आहे

या बैठकीत भाजपचा मोठा नेता लोकसभा समन्वयक अ‍ॅड. ललिता पाटील (Adv. Lalita Patil) उपस्थित होत्या. यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपामध्ये गेल्या पाच वर्षात आपण प्रामाणिकपणाने काम करून देखील आपल्याला कोणतेही पद देण्यात आले नाही. भाजपच्या बैठकांना ही आपल्याला बोलविले जात नव्हते. सातत्याने आपल्याला डावलण्यात येत होते, असा आरोप अ‍ॅड. ललिता पाटील यांनी केला आहे.

त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असून मात्र, भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कडून आपल्याला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी तिकीट मिळेल, असा विश्वास असल्याचेही अ‍ॅड. ललिता पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र आयात उमेदवारांऐवजी कोणत्याही परिस्थितीत पक्षातच उमेदवारी द्यावी असा सूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दुसरीकडे आम्ही जो उमेदवार देऊ तो तुम्हाला मान्य असेल का? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी केला असता, त्यासही होकार देण्यात आला.