---Advertisement---
वाणिज्य

पुन्हा लॉकडाऊनची धास्ती! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी तब्बल ४०० अंकांनी कोसळला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाली आहे. ओमिक्राॅनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केली. या धामधुमीत सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४०० अंकांनी कोसळला आहे. यामुळे काही मिनिटांत तीन लाख कोटींचा चुराडा झाला.

share market 1

सकाळी १०.३० च्या सुमारास सेन्सेक्स १२५०.९१ अंकांनी घसरून ५५,७७०.८३ वर व्यवहार करत होता. NSE निफ्टी ३८० अंकांनी घसरून १६,६०४.८० वर व्यवहार करत होता. दिवसभराच्या व्यवहारात बाजारावर दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

---Advertisement---

गेल्या आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १७७४.९३ अंकांनी म्हणजेच 3 टक्क्यांनी घसरून ५७,०११.७४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी50 देखील ५२६.१ अंकांनी घसरला आणि १६,९८५.२ अंकांवर बंद झाला. सलग दोन आठवड्यांच्या तेजीनंतर ही घसरण झाली आहे.

भारतासह जगभरात ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढ करण्याचे धाडसी निर्णय घेतले. यामुळे द्विधा मनस्थिती झालेल्या गुंतवणूकदारांनी आज बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. युकेमध्ये ओमिक्राॅनच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

आजच्या सत्रात सेन्सेक्सवरील ३० पैकी केवळ ४ शेअर तेजीत आहेत तर २६ शेअरमध्ये घसरण झाली आहे. ज्यात इन्फोसिस, नेस्ले, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, एचसीएल टेक, एचयूएल , टेक महिंद्रा , एनटीपीसी, रिलायन्स, एसबीआय, एचसीएफसी बँक, बजाज फायनान्स या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे. निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---