---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर काँग्रेस हायकंमाडचा मोठा निर्णय

nana patole (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाला. राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. आता यावर काँग्रेस हायकंमाडने मोठा निर्णय घेतला आहे.

nana patole (1)

नाना पटोलेंनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना पटोले यांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा अद्याप काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते.

---Advertisement---

“आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल”
आता काँग्रेस हायकमांडकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. “ही राजीनामा देण्याची वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नाही. हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका. हायकंमाडच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल”, असे काँग्रेस हायकमांडने सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---