---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

Big Breaking : शिवसेनेच्या शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी, शहर पोलीस ठाण्यात गोंधळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते प्रक्षोभक भाषण करीत होते. दरम्यान, शरद कोळी यांच्यावर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार असून त्यांना अटक केली जाणार असल्याचे समजताच जळगावात शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

images 27 jpeg webp webp

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. दरम्यान, कोळी यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना गुर्जर समाजाविरुद्ध शब्दात टीका केली असल्याचे सांगत आजच त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुर्जर समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.

---Advertisement---

दरम्यान, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यामुळे आज चोपडा तर उद्या मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज कोळी यांना जारी केली.

नोटीस जारी करतानाच जळगाव एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे पथकासह जळगावात ते राहत असलेल्या रेल्वेस्टेशनजवळील हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलीस ताब्यात घेणार असल्याचे वाटल्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हॉटेलमध्ये पोलीस विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहिले होते. बराच वेळ त्याठिकाणी गोंधळ सुरू होता.

अखेर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी पायी चालत शहर पोलीस ठाण्यात पोहचले. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांना संजय सावंत यांनी शरद कोळी कोणतेही भाषण करणार नसल्याची ग्वाही दिल्यावर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे मार्गस्थ झाले. दरम्यान, शरद कोळी यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्ह्यात त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून शिवसेना नेत्यांच्या ताफ्यामागे पोलिसांची वाहने देखील रवाना झाली आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---