---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. केतकी पाटील यांची वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा ; स्वातंत्रदिनापर्यंत सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्‍त मोठी घोषणा केली असून स्वातंत्रदिनापर्यंत रूग्णांची सवलतीच्या दरात एम आर आय, सी.टी स्कॅन, सोनोग्राफी व एक्सरे तपासणी केली जाणार आहे. ह्या तपासणी डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात केल्या जाणार आहे.

ketki patil jpg webp webp

कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी त्याची दिशा ठरविणे आवश्यक असते. ही दिशा ठरविण्याकरीता आजाराचे अचूक निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात आजाराचे अचूक निदानासाठी एमआरआय, सीटी स्कॅन तपासणी आता सवलतीच्या दरात होत असून या विभागाची सेवा रूग्णांसाठी सर्वोत्तम ठरत आहे. आजपासून डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त एम आर आय, सीटी स्कॅन तपासणी आता सवलतीच्या दरात सुरु झाली आहे. एकाच छताखाली तपासण्या व निदानाची येथे व्यवस्था असून डॉक्टरांचा सल्‍ला देखील येथे मोफत उपलब्ध आहे.

---Advertisement---

येत्या १५ ऑगस्ट पर्यंत रुग्णांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यात एम आर आय ४०००/— , सी.टी.स्कॅन १५००/— सोनोग्राफी अवघ्या ५००/— रू तर एक्सरे १५०/— रू पासून पुढे केले जात असून इतर तपासण्या देखिल अल्पदरात केल्या जात आहे. बाहेर कुठेही साधारण एम आर आय करायचा म्हटला तर कमीत कमी ६०००/— पासून पुढे खर्च येतो तर सी.टी स्कॅनसाठी २५००/— पासून पुढे याचबरोबर सोनोग्राफी १०००/— पासून पुढे असा खर्च येत असल्याने पैशाअभावी उपचार देखील थांबवले जात असतात. ही परिस्थीती जाणून घेत सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ.केतकी वैभव पाटील यांनी ही घोषणा आज केली आहे. त्वरित रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---