⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | बातम्या | लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । देश आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यवरून ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

काय आहे घोषणा?
‘पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत.डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी त्यांना पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. त्यामुळे आता येत्या 5 वर्षांत 75,000 जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे’ असंही पीएम मोदी म्हणाले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.