जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२५ । एकीकडे ऑनलाईन सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. मात्र यातच भुसावळमधून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात भुसावळ शहरातील टेमी व्हिला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेल्या धनादेशचा गैरवापर करून सुमारे २५ लाख ५ हजार ६०० रूपयांची फसवणूक केली आहे. २ जानेवारी रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील अदिल रूसी कविना (वय ५७ रा. टेमी व्हिला, भुसावळ) व्यापार करून ते उदरनिर्वाह करतात. त्यांच्या ओळखीचे कृष्णा संजय उपाध्याय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिरवार्ड, भुसावळ) यांना विश्वासाने २ धनादेश देण्यात आलेले असतांना दोघांनी २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर दरम्यानच्या काळात संगनमत करून १ लाख १५ हजार आणि २३ लाख ९० हजार ६०० रूपयांचे वेगवेगळे चेक परस्पर खात्यात वर्ग करून फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर आदिल कविना यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसार गुरूवारी दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कृष्णा संजय उपाध्याय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिर वार्ड, भुसावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.