---Advertisement---
भडगाव

भुसावळातील विद्यार्थ्याचा डेंग्यूने घेतला बळी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भुसावळात डेंग्यूमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. साहिल सुनील बठेजा (वय २०) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मृत साहिल हा कुटुंबातील एकुलता एक होता.

sahil bajetha jpg webp

भुसावळ शहरातील प्रभाग २० मधील हनुमान नगरातील साहिल बठेजा हा मुंबई येथे बीबीएच्या अभ्यासक्रमाला होता. गेल्या आठवड्यात ताप आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, शहरातील खासगी दवाखान्यात उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यास दोन, तीन दिवसांपूर्वीच जळगाव येथील सहयोग क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

---Advertisement---

तेथे उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंधी कॉलनीत खळबळ उडाली. मृत साहिल हा कुटुंबातील एकुलता एक होता. दरम्यान, भुसावळ शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असूनही प्रशासनाकडून कंटेनर सर्वेक्षणाशिवाय अन्य ठोस उपाययोजना नाहीत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सिंधी कॉलनीत २६० घरांमध्ये तातडीने कंटेनर सर्वेक्षण केले. त्यात २५ कंटेनर दूषित म्हणजेच तेथे डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आढळल्या. आठवडाभरात शहरात सर्व मिळून १६०० घरांचे सर्वेक्षण झाले. त्यातही एकही कंटेनर दूषित आढळले नाही.

दरम्यान, यापूर्वी देखील शहरातील मूळ रहिवासी १३ वर्षीय मुलाचा औरंगाबाद येथे डेंग्यूने मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शहरात अपेक्षित उपाययोजना नाही. कंटेनर सर्वेक्षणाची औपचारिकता सुरू असली फवारणी, धुरळणी, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---