वारकऱ्यांनो लक्ष द्या ! आषाढी वारीनिमित्त भुसावळ – पंढरपूर विशेष रेल्वेगाडी आज सुटणार

जुलै 11, 2025 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । मध्य रेल्वेने भुसावळ – पंढरपूर दरम्यान दोन विशेष अनारक्षित रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. ही गाडी शनिवार ५ जुलैला दुपारी १.३० वाजता भुसावळ जंक्शनवरून सुटणार आहे.

bhusawal pandharpur express jpg webp

भुसावळ जंक्शनवरून पंढरपूरसाठी विशेष गाडी सोडली जाणार आहे. गाडी क्रमांक ०११५९ (भुसावळ- पंढरपूर अनारक्षित विशेष) ही गाडी ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी ०११६० पंढरपूर -भुसावळ अनारक्षित विशेष गाडी ६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

Advertisements

ही गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्दुवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा होणार आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now