जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज नागपूर येथे सायंकाळी 4 वाजता पार पडणार असून शपथविधी अवघे काही तास उरले आहे. दरम्यान आता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते शपथ घेणार आहेत यांची नावं समोर आली आहेत. त्यानुसार भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय वामन सावकारे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून फोन आल्याची माहिती मिळाली असून ते सकाळीच नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात त्यांच्याकडे मंत्रिपद देखील आले होते. त्यामुळे पक्षाकडून सावकारे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. भुसावळ तालुक्याला पुन्हा मंत्रीपदाचा मान मिळाल्यामुळे आता तालुक्यातील व मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणखी वेगाने सुटतील अशी आशा जनतेला लागून आहे.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचे नाव समोर
भाजपाचे 20 मंत्री नेमके कोणते? :
1) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
2) चंद्रशेखर बावनकुळे
3) नितेश राणे
4) शिवेंद्रराजे भोसले
5) चंद्रकांत पाटील
6) गिरीश महाजन
7) पंकजा मुंडे
8) जयकुमार रावल
9) राधाकृष्ष विखे-पाटील
10) गणेश नाईक
11) पंकज भोयर
12) मेघना बोर्डिकर
13) माधुरी मिसाळ
14) अतुल सावे
15) आकाश फुंडकर
16) अशोक उईके
17) आशिष शेलार
18) मंगलप्रभात लोढा
19) जयकुमार गोरे
20) संजय सावकारे
शिवसेनेचे 12 मंत्री नेमके कोणते? :
1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
2) उदय सामंत
3) प्रताप सरनाईक
4) भरत गोगावले
5) शंभूराज देसाई
6) आशिष जैयस्वाल
7) गुलाबराव पाटील
8) संजय राठोड
9) संजय शिरसाट
10) दादा भुसे
11) प्रकाश आबिटकर
12) योगेश कदम
राष्ट्रवादीचे 10 मंत्री नेमके कोणते? :
1) अजित पवार (उपमुख्यमंत्री)
2) आदिती तटकरे
3) नरहरी झिरवाळ
4) दत्ता भरणे
5) हसन मुश्रीफ
6) बाबासाहेब पाटील
7) मकरंद पाटील
8) इंद्रनील नाईक
9) धनंजय मुंडे (निर्णय बाकी)
10) छगन भुजबळ (निर्णय बाकी)