जळगाव लाईव्ह न्यूज | ०३ जून २०२४ | हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज होता. आज सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे असह्य करणाऱ्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला.

केरळात दाखल झालेला मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या पार्शवभूमीवर काही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविला.
आज सायंकाळी जामनेर भुसावळ, जळगावसह काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसाने हजेरी लावली. भुसावळ शहरासह परिसरात रात्री सुमारे आठ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसापासून उष्णतेमुळे हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.दरम्यान, राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे लोकसभा मतदान निकालावर पावसाचं सावट आहे.