---Advertisement---
भुसावळ राजकारण

भुसावळ पालिकेचे समीकरणे बदलणार, उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. जळगावसह भुसावळात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. भुसावळ शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे डी.एस.ग्राऊंडवर होणार्‍या कार्यकर्ता मेळाव्यात तब्बल 22 नगरसेवक हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याने आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याने कोणत्या पक्षात खिंडार पडेल हे उद्याच कळणार आहे.

rashtrwadi ncp

भुसावळात उद्यात सरदार पटेल पुतळ्याचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी 12.30 वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

---Advertisement---

लोकार्पण सोहळ्यास सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती
लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे देण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.

कार्यकर्ता मेळाव्यात जम्बो पदाधिकार्‍यांचा प्रवेश
शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भुसावळ शहर विभागातील पदाधिकार्‍यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. भुसावळ शहरातील 18 विद्यमान तर चार माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे संकेत आहेत.

यांची मेळाव्यास राहणार उपस्थिती
राष्ट्रवादीच्या मेळाव्यास माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार ईश्वर जैन, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्यंने उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---