⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आ. किशोर पाटील यांच्या हस्ते कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांच्या कामांचे भुमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । राज्याच्या अंदाजपत्रकामधुन कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी सव्वा तीन कोटी रूपये मंजुर करण्यात आले असून भडगाव-आमदडदे रस्ता, कजगाव ते कनाशी रस्ता कारपेट सिलकोट, कनाशी ते वडधे फाटा कारपेट सिलिकोट तर कोठली गावात काॅक्रीटीकरणाच्या कामाचे भुमिपुजन शुक्रवार दि.२४ रोजी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातुन कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांना राज्याच्या अंदाजपत्रकातुन मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सव्वा तीन कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. भडगाव तालुक्यातील कनाशी तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभरात लौकिक असून महाराष्ट्र भरातून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शनाला येत असतात त्यामुळे भाविकांची व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होत होती. आमदार किशोर पाटील यांनी याची दखल घेत या कामाच्या मंजूरीसाठी प्रयत्न केले होते. दरम्यान, शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी १०.३० वाजता कोठली (ता.भडगाव) येथे कामांचे भुमिपुजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील, डॉ.विशाल पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, युवा नेते संजय पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, विजय पाटील, कोठलीचे सरपंच कांतीलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक पाटील, गोंडगावचे राहुल पाटील, बोदर्डेचे उपसरपंच बबलू पाटील, प्रकाश परदेशी, पप्पू पाटील, बांधकाम विभागाचे एस.आर. राऊत , भास्कर पाटील, भागवत पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.