⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भागवत भंगाळे यांनी भरले होते कर्ज

भागवत भंगाळे यांनी भरले होते कर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । बीएचआर प्रकरणात हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, भंगाळे यांनी कर्ज २००८ मध्ये फेड करीत निरंकचा दाखला देखील घेतला होता.

बीएचआर प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून अनेकांभोवती फास आवळला गेला आहे. जळगावातील प्रसिद्ध हॉटेल  व्यावसायिक व सोने व्यापारी भागवत गणपत भंगाळे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, भागवत भंगाळे यांनी बीएचआरमधून ४ एप्रिल २००७ रोजी २५ लाख मुदत कर्ज घेतले होते. 

कर्जाची परतफेड त्यांनी २२ मे २०१८ रोजी केली असून त्याचा निरंक दाखला देखील घेतला आहे. भंगाळे यांनी कर्जपोटी तारण ठेवलेली मेहरूण शिवारातील मालमत्ता रिलीज केल्याचे पत्र २२ मे २०१८ रोजी त्यांना दिले असल्याची माहिती सागर भंगाळे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.

हे देखील वाचा : 

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील मैदानात ; घरकुलप्रमाणे त्रयस्थ अर्जदार म्हणून याचिका दाखल करणार

बीएचआर प्रकरणात अडकणारा ‘तो’ आमदार कोण?

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.