जळगाव शहर

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील मैदानात ; घरकुलप्रमाणे त्रयस्थ अर्जदार म्हणून याचिका दाखल करणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ ।  बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांसह राज्यातील इतर ठिकाणी एकच वेळी छापे टाकून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात बड़या व्यावसायिकांसह राजकीय व्यक्ति अशा 11 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे राजकीय व व्यवसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता बीएचआर घोटाळाप्रकरणी अ‍ॅड. विजय पाटील हे त्रयस्थ अर्जदार म्हणून कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांनी बीएचआर गैरव्यहार प्रकरणी पहिल्यापासून पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. याचमुळे बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याने इतरांच्या मदतीने अब्जावधी रूपयांचा केलेला गैरव्यवहार समोर आला. यामध्ये आजवर अनेकांना अटक करण्यात आली असली तरी अजून बरेच काही मोठे मासे अडकले नव्हते. परंतु आजच्या अटकेनंतर अनेक बडे मासे अडकणार आहेत. कारण त्यांच्या विरूध्द घोटाळ्याचे थेट कागदोपत्री पुरावे आहेत. आपण या प्रकरणी आजवर ठेविदारांच्या पाठीशी उभे होतो. आणि पुढे देखील राहू असे अ‍ॅड. पाटील म्हणाले.

अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळात सुनील झंवर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीने कसा हस्तक्षेप करत होता याबाबत जाहीर वाच्यता केली आहे. या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तर आजच्या अटकेनंतर ते याच प्रकरणात त्रयस्थ अर्जदार म्हणून कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button