---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

भोरस बु. येथे जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड ; १० जणांवर कारवाई

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून साडेसहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत १० जणांवर कारवाई केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील भोरस बुद्रुक येथे घडलीय.

crime

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु आहे. असे असतानाही भोरस बुद्रुक येथे बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुरूवारी रात्री १० वाजता पथकाला रवाना केले. गावातील रिक्षास्टॉपच्या पाठीमागे असलेल्या अवैध सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून ६ हजार ५८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच १० जणांवर कारवाई केली आहे.

---Advertisement---

यांच्यावर केली कारवाई

रावसाहेब वाल्मिक पाटील, रामदास वामन पाटील, शंकर सुरेश खैरनार, संदिप अण्णा मोरे, वसंत बारकू पाटील, सुल्तान मस्ताज सैय्यद, रियाज शेख सवौद्दीन, कृष्णा भगवान पवार, गोरखनाथ सुरेश जगताप व किरण देवीदास साळूंके सर्व रा‌. भोरस ब्रु. ता. चाळीसगाव यांच्यावर कारवाई केली आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज नाईक, शांताराम पवार, भुपेश वंजारी, दत्तु महाजन, जयवंत सपकाळे, प्रेमसिंग राठोड व नितेश पाटील यांनी केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास बिभिषण सांगळे हे करीत आहेत.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---