जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुने २०२३ । वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्राची परंपरा. या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी. छ. शिवाजी महाराज, साधु संतांच्या दर्शनाला जात अन वारीला हि भेट देत. भक्तिगंगा शक्तीगंगा संगम ही परंपरा आत्ताची नसून साक्षात छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा काळातील आहे.
जळगाव जिल्ह्यातील धारकऱ्यांनी तीच परंपरा कायम राखत संताचे आशिर्वाद घेतले. जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम संस्थांची संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची श्रीराम मुक्ताई पालखी गेल्या दीडशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा जपत वटपौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरकडे पायी वारी प्रस्थान करते या दिवसाचे औचित्य साधत पांडे डेअरी चौक येथे भक्ती गंगा शक्ती गंगा हा सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला.
या सोहळ्याच्या वेळी जळगावच्या शिवतीर्थ येथून आलेली भक्ती ज्वाला ज्योत व्यासपीठाजवळ स्थापन करण्यात आली होती श्रीराम मुक्ताई पालखीचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यावर विद्यमान गादीपती मंगेश महाराजांनी छत्रपती शिवाजी व संभाजी यांच्या प्रतिमेस पूजन करून वंदन केले त्याचवेळी उपस्थित धारकऱ्यांनी संत मुक्ताईच्या पालखीचे भक्ती भावाने दर्शन घेतले वारकरी शिवाजी यांचा जयघोष करता येत तर धारकरी संत मुक्ताई प्रभू श्रीराम यांच्या चरणी नतमस्तक होत आहेत असा हा भक्ती शक्तीचा अभूतपूर्व संगम सोहळा संपन्न झाला. हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने श्रीराम मंदिर संस्थांचे गादीपती मंगेश महाराज यांना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून वंदन केले व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आशिर्वाद घेतले.
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी ह भ प सौरभ महाराज पाटील यांनी उपस्थित धारकऱ्यांना संबोधित केले. ध्येय मंत्र म्हणून सांगता करण्यात आली. यावेळी शहरातील तसेच जिल्ह्यातील शिवप्रेमी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.