---Advertisement---
भडगाव गुन्हे

अरे बापरे..! वाळूने भरलेले ट्रॅक्टर थेट वस्तीत शिरले, एका चिमुकलीचा मृत्यू, अनेक जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असूनही वाळू वाहतूक करणारे वाहन सुसाट धावत आहे. अशातच भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. ज्यात वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर थेट वस्तीत शिरल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तसेच यात सहा जण जखमी झाले झाल्याचे कळत असून

bhadgaon jpg webp webp

नेमकी काय आहे घटना
आमडदे परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात असून याच दरम्यान, आज बुधवारी पहाटे वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या जोरदार धडकेमुळे एक बालिकाचा मृत्यू झाला या भागात कच्चे बांधकाम केलेले घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ते कोसळून यात काही लोक जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

---Advertisement---

दरम्यान, दुर्घटना झालेल्या ठिकाणी मोठा जमाव जमला असून यासंदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---