भडगाव महसूलच्या पथकाला वाळूमाफियांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

जून 24, 2025 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून त्यात वाळू माफियांकडून महसूल पथकाकडून होणारे हल्ले देखील वाढले आहे. अशातच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तहसील कार्यालयाला आणत असताना महसूलच्या पथकाला वाळूमाफियांनी मारहाण केली. ही घटना घोडदे येथील दर्याजवळ २३ रोजी रात्री घडली. तलाठ्यांच्या डोळ्यावर व चेहऱ्यावर वाळू फेकत १० ते १२ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी १२ विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

crime 2 jpg webp webp

मंडळ अधिकारी कुणाल सुकदेव कोळी यांनी तक्रार दिली की, २३ रोजी रात्री १२.४० वाजता ते तसेच ग्राम महसुल अधिकारी मेहमूद जब्बार खाटीक, प्रशांत कुंभारे, विशाल सूर्यवंशी हे जुना पिंपळगाव रस्त्यावरील घोडदे भागात नदी पात्राजवळ गस्त घालित होते. तेव्हा गिरणेतून वाळूचे दोन ट्रॅक्टर वाहतूक करताना दिसले. दोन्ही ट्रॅक्टर तहसीलला नेताना मारहणाण केली.

Advertisements

पथकाला धक्काबुक्की करून केली मारहाण
हे दोन्ही ट्रॅक्टर पुढील शासकीय कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत असताना घोडदे बाबा दर्गाजवळ १० ते १२ जण आले व त्यांनी एका ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी प्रशांत कुंभारे यांच्या चेहऱ्यावर वाळु फेकली व दूसऱ्या ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी विशाल सूर्यवंशी यांना खाली ओढले. त्यानंतर त्यांनी या सर्वांना धक्काबुक्की व शिवीगाळकरुन रस्त्याच्या कडेला ढकलुन दिले. एकाने तलाठी मेहमूद खाटीक यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी देन्ही ट्रॅक्टरमधील वाळु रस्त्याच्याकडेला खाली करून पळवुन घेवुन गेले. त्यातील एकास पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment