थंडीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । थंडीत फिरायला अनेक लोकांना आवडते. मात्र थंडीत फिरायला जायचे म्हटल्यावर अनेकजण घाबरतात. अनेकांना आजारी पडण्याची भिती असते. परंतु भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे थंडीतदेखील ऊब जाणवते. थंडीत जर ऊबदार ठिकाणी फिरायला गेल्याची मज्जा काही वेगळीच असते. अशाच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही थंडीत फिरायला जाऊ शकता.
कुर्ग, कर्नाटक
उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेकडील भागात हिवाळा कमी जाणवतो. कर्नाटकातील कुर्ग या ठिकाणी तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाऊ शकता. हिरवी झाडी, दऱ्या आणि सहादरित झाडांनी वेधलेले आहेत. पर्यटकांसाठी फिरण्यासाठी ही खूप चांगली जागा आहे, येथे तुम्ही अॅबे फॉल्स, नामड्रोलिंग मठ, पुष्पगिरी अभयारण्य या ठिकाणी भेट देऊ शकता.
गोवा
हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी गोवा हा चांगला पर्याय आहे. समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. येथील वातावरण प्रर्यटकांना आवडेल. तेथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, चर्च या ठिकाणी नक्की भेट द्या.
केरळ
भारतात केरळला स्वर्ग मानले जाते. येथील अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यानंतर केरळ खूप जास्त सुंदर असते. तेथील हिरवी झाडी, चहाचे मळे, हाऊस बोट साईड प्रेक्षकांना नेहमी आकर्षित करतात. केरळ हे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
जोधपुर
राजस्थानमधील जोधपुर येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. येथील मेहरानगढ किल्ला, उम्मेद बवन पॅलेस आणि शांत महामंदिर येथे तुम्ही भेट देऊ शकता.