⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

नव्या सरकार स्थापनेआधी RBI ची रेपो रेटबाबत मोठी घोषणा…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । आरबीआयची चलन विषय धोरण समितीची बैठक आज समाप्त झाली या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये रेपो रेट मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. रेपो रेट दरात शेवटचा बदल फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो ६.५ % करण्यात आला होता. तेव्हापासून तो स्थिरच आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल किंवा बँक एफडी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी बँकेचा हा निर्णय समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

रिझर्व बँकेच्या या चलनविषयक धोरण समितीची ही सलग आठवी बैठक असून यामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँक बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण जाहीर केलं आहे. महागाईमुळे रेपो दर जुन्या पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. RBI ने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम आहे. पुढील बैठकीतही रेपो दरात कपात होण्याची फारशी आशा नाही. सध्या महागाईचा दर सरकारने ठरवलेल्या मर्यादेपलीकडे जात आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई दर २ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत RBI कडून रेपो दरात कपात केली जाण्याची शक्यता तज्ज्ञांना आहे.

रेपोदर म्हणजे काय?


ज्या दराने बँक रिझर्व बँकेकडून पैसे घेतात तो दर म्हणजे रेपो रेट. आता रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात दर कर्ज दरात वाढ होणे,आणि रेपोदर कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणार. आरबीआयच्या दराने इतर बँकांकडून पैसे घेतो तो दर म्हणजे रिझर्व रेपो रेट.