---Advertisement---
गुन्हे पाचोरा

कामावरुन घरी परतणाऱ्या पिता-पुत्रावर मधमाश्यांचा हल्ला ; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील बाप लेकावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. सैय्यद सबदर इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

madhmashi jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास रोजंदारीचे काम करून बनोटी शिंदोळ मार्गाने परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या.

---Advertisement---

अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही घाबरुन गेले. यावेळी मधमाश्यांनी तोंडावर, डोक्यात आणि हात पायांवर जोरदार डंख मारले. या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व जखमी आबीद याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावर उपचार सुरू आहेत.

मयत सैय्यद इस्माईल यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---