---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय वाणिज्य

बिअरप्रेमींसाठी गुडन्यूज ! 200 रुपयांची बिअर फक्त 50 रुपयांत मिळणार? बातमी एकदा वाचाच..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । तुम्हीही बिअरप्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे 200 रुपयांना मिळणारी बीयर आता 50 रुपयांत मिळणार असल्याचे मेसेस व्हायरल होत आहे. सरकार बिअरवरील टॅक्स कमी करणार असल्याचा दावा केला जातोय.

beer

हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे बिअर प्रेमींच्या आनंदाला उधाण आलय. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेचच चिअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केलीये. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बिअर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

---Advertisement---

खरंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या 6 मे रोजी एक करार झाला. या कराराअंतर्गत, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या बीयरवरील कर 150 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे 200 रुपयांना मिळणारी बीयर आता 50 ते 70 रुपयांदरम्यान मिळू शकते, असा अंदाज आहे. याचा थेट फायदा बीयरप्रेमींना मिळणार आहे.

या कराराचा फायदा केवळ बीयरपुरताच मर्यादित नाही. ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरही कर 150 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर आणला गेला आहे. त्यामुळे हाय-एंड स्कॉचची किंमतही लक्षणीय घटण्याची शक्यता आहे. याशिवाय ब्रिटनमधून आयात होणाऱ्या कार्स आणि इतर उत्पादनेही यामुळे स्वस्त होतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment