⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ‘वासुकमल बिल्डर’कडून फ्लॅट घेताना काळजी घ्या : वाचा कुणी आणि का? शेअर केली ही पोस्ट

‘वासुकमल बिल्डर’कडून फ्लॅट घेताना काळजी घ्या : वाचा कुणी आणि का? शेअर केली ही पोस्ट 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ हायवे नजीक असलेल्या वासुकमल विहार या सोसायटीच्या रहिवाशांनी बुधवारी रात्री थेट बिल्डरचे कार्यालय गाठले. त्यानंतर शहर पोलीस ठाणे आणि जिल्हापेठ पोलिसात ४०-५० महिला पुरुष जमले होते. बिल्डरने आमची फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. दरम्यान, वासुकमल विहारचे एक रहिवासी फ्लॅटधारक अमर जैन यांच्या मुलाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा काय आहे पोस्ट…!

 

आम्ही फसलो तुम्ही फसू नका
‘वासुकमल बिल्डर’ कडून फ्लैट घेताना काळजी घ्या
अन्यथा आयुष्याची पुंजी गमवून बसाल

 

जळगाव येथे स्वतः ला उत्कृष्ट बांधकाम व्यायसायिक म्हणून घेणारे श्री. शिरीष काबरा यांनी गुजराल पेट्रोलपंपाजवळ हायवे नजिक ‘वासुकमल विहार’ ही फ्लैट सिस्टीम तयार केली आहे. येथे मी फ्लैट घेतला आहे. फ्लैट बूक करताना मला चार रंगातील ब्राऊचर (माहितीपत्रक) देऊन फ्लैटमध्ये व सिस्टीममध्ये काय सुविधा देणार ? हे श्री. कुश काबरा यांनी पटवून सांगितले होते. त्यानंतर मी फ्लैट बूक केला. बुकिंग अमाऊंट भरली. ठरल्याप्रमाणे पुढे फ्लैटच्या किमतीनुसार रक्कम देत गेलो. सर्व व्यवस्थित सुरू आहे असे वाटत होते. मात्र माझ्या अगोदर फ्लैट बूक केलेल्या काही सदस्यांनी सुविधांबाबत तक्रारी सुरू केल्या. बिल्डर श्री. काबरा यांना ब्राऊचर मध्ये नोंदलेल्या सामुहिक व व्यक्तिगत सुविधा दिलेल्या नाहीत अशी तक्रार हे सदस्य करीत होते. काही सदस्य बिल्डर श्री. काबरा यांना भेटले. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले.

बिल्डरपैकी एक श्री. शिरीश काबरा म्हणायचे, ‘माझ्या मुलाशी बोला !’ मुलगा श्री. कुश काबरा म्हणायचा ‘ माझ्या बापाशी बोला !’ यात फ्लैट घेणारे सदस्य हेलपाटे मारत होते. दुसरीकडे बिल्डर काबरा हे फ्लैट सिस्टीममध्ये सतत बदल करून तशा नकाशा जळगाव मनपा नगररचना विभागाकडून मंजूर करून घेत होते. या बदलाची कोणतीही लेखी सूचना फ्लैट घेतलेल्या सदस्यांना दिलेली नव्हती.
जेव्हा माझी फ्लैट खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा फायनल हिशोब करताना मी सुविधा बद्दल बोललो. तेव्हा काबरा बिल्डरने टाळाटाळ करीत केवळ आश्वासने देणे सुरू केले. काही मित्रांना उलट सुलट सांगून मध्यस्थाचे काम करायला लावले. अर्था हा मध्यस्थ फ्लैट घेणाऱ्या सदस्यांची दिशाभूल करीत होता. नंतर असे कळले की ते ब्राऊचर छापणाऱ्या एजन्सीचा मालक तो मध्यस्थ आहे. काबरा बिल्डरला सांगितले की, ‘तुम्ही ब्राऊचरमध्ये नोंदलेल्या सुविधा का देत नाही ?’ तर श्री. शिरीष काबरा म्हणायचे, ‘ब्राऊचर हे मार्केटिंगसाठी असते. आम्ही ब्राऊचरच्या खाली डिस्ककलेमर लिहिलेले आहे. काही गोष्टी फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असतात’ प्रत्यक्षात मात्र शक्य होत नाही हे वाक्य आहे या बिल्डरचे.
हा सर्व प्रकार म्हणजे जळगाव व पुण्यात वासुकमल नावाने काम करणाऱ्या काबरा बिल्डरने अनेकांची फसवणूक करणारा आहे, हे आमच्या लक्षात आले. काबरा बिल्डर व त्याचा मध्यस्थ सर्वांना फसवत होते. या मध्यस्थाने पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या जुजबी (फक्त एका भेटीची ओळख) ओळखीचा लाभ उठवत खोट्या-नाट्या तक्रारी केल्या. या सिस्टीममध्ये फ्लैट घेणाऱ्या ४८ सदस्यांना बिल्डर व मध्यस्थाने मूर्ख बनवले. मी सुविधा मागत असल्याचे पाहून माझ्या विरोधात खोटी तक्रार जिल्हापेठ पोलिसात करण्यात आली. त्यात खोटेपणा करीत लिहिले की ‘मी मी कुलूप तोडून फ्लैटचा ताबा घेतला.’ जेव्हा बिल्डरला मी फायनल हिशोब करायला सांगत होतो. माझ्या हिशोबाने केवळ २ लाख रूपये देणे शिल्लक होते. मग आम्ही ४२ सदस्य एकत्र आलो आणि बिल्डर विरोधात रेरा कडे तक्रार केली. तेव्हा बिल्डर काबराने माझ्या विरोधात दिवाणी खटल्यासाठी नोटीस पाठवली. असा हा फसवणूक करणारा काबरा बिल्डर जळगाव व पुण्यात फ्लैट बांधून अनेकांना फसवत आहे. काबरा बिल्डरने ब्राऊचर मध्ये जिम, हॉल, प्रशस्त लॉबी, वेटिंग रूम, बगीचा अशा सुविधा लिहिलेल्या आहेत. पणा प्रत्यक्षात तसे काही नाही. आम्हाला मनस्ताप देण्याऱ्या या फसव्या बिल्डरला कायदेशीर मार्गाने लढा देऊन वठणीवर आणण्याचा निर्धार ४२ सदस्यांनी केला आहे. यापुढे या काबरा बिल्डरकडून इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून मी एवढे सविस्तर लिहिले आहे. आता आम्ही थांबणार नाही व इतरांना फसवू देणार नाही.
क्रमशः
अमर (भागचंद) मोतीलाल जैन
वासु कमल बिल्डर कडून फसवणूक झालेला फ्लैटधारक

जितेंद्र अमर जैन यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे.

पहा फेसबुक लिंक :

https://www.facebook.com/100001984083758/posts/4490056837737075/

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.