---Advertisement---
हवामान आरोग्य

काळजी घ्या.. उद्यापासून तीन दिवस वाढणार थंडीची तीव्रता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिनाभरापासून थंडीत चढउतार पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात थंडीची तीव्रता सर्वाधिक होती त्यानंतर सात-आठ दिवस पारा पुन्हा वाढू लागला होता. दरम्यान, उद्या दि.११ पासून १४ पर्यंत पुन्हा थंडीतही तीव्रता वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

thandi shekoti

जळगाव विभागात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पारा अचानक खाली गेला होता. तापमान १० अंशाच्या खाली असल्याने वातावरण प्रचंड गारठले होते. फेब्रुवारीला सुरुवात झाल्यानंतर पारा पुन्हा वाढू लागला तर उन्हाचे चटके देखील जाणवत होते. थंडी गेली आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली असे वाटत असतानाच थंडी पुन्हा परतणार आहे. जळगाव विभागात दि.११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान थंडीची तीव्रता वाढणार आहे. तसेच दि.१४ फेब्रुवारीपासून पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

भुसावळ येथील वेलनेस कोच निलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात देखील थंडी आणि गरमीमध्ये अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस थंडी वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः तापमानातील बदल सहन न होणारे, लहान मुले, वयोवृद्ध आणि अस्थमा रुग्णांनी थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---