---Advertisement---
जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांची दिवाळी गोड; केळी पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

---Advertisement---

जळगाव ग्रामीण आणि धरणगावमधील शेतकऱ्यांनी मानले ना.गुलाबराव पाटील यांचे आभार

GP banana crope 1

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर केळी पीक विम्याचे हेक्टरी ७० हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे. शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी मदत उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जात असून, रक्कम जमा झाल्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जात आहे. पैसे जमा होत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

---Advertisement---

खरीप हंगाम २०२३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या काळात झालेल्या पीक नुकसानीमुळे अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली होती. मात्र आता या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीकविमा अग्रिमाच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वितरणाला सुरुवात झाली असून, यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर केळी पीक विम्याचे हेक्टरी ७० हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

आत्मा कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष पी.के पाटील म्हणाले की, ना.गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच आम्हा शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी ही रक्कम मिळत आहे. यासाठी त्यांनी जळगाव ग्रामीण आणि धरणगावमधील शेतकऱ्यांच्या वतीने ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचं संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने देशात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना ही गरीब शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत असून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. यावर्षीच्या म्हणजेच २०२३ मधील खरीप हंगामामध्ये तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरलेला आहे. केवळ १ रुपया भरुन हा पीक विमा काढायचा होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---