शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी
जळगाव लाईव्ह न्युज । १९ ऑक्टोबर २०२२ । खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खतांची खरेदी करत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार खतांचे तब्बल ९२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १९ खतांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यामुळे या खतांच्या विक्रीवर राज्यात सरसकट बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेमकी का घातली बंदी
खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार खतांचे तब्बल ९२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १९ खतांचे नमुने अप्रमाणित आढळले. त्यामुळे या खतांच्या विक्रीवर राज्यात सरसकट बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या खंतावर बंदी?
१९ खतांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यामुळे या खतांच्या विक्रीवर बंद घालण्यात आलेली आहे. त्यात जिंकेटे एस. एस. पी, रामा फॉस्फेट (उदयपूर), कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक, एस. एस. पी के. पी. आर, ग्रो केम, अन्य खतांचा समावेश आहे.
खतांमधील इनग्रेड कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना उत्पादकांचा परवाना, ओ फार्म स्टेटमेंट, प्रिन्सिपल सर्टिफिकेटची तपासणी करावी अन्यथा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा देखील इशारा कृषी सहसंचालकांच्या आदेशाने देण्यात आला आहे.