जळगाव लाईव्ह न्यूज । बजाज ऑटोने भारतीय बाजारात त्यांच्या नवीन चेतक 35 सीरीज इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केला आहे. ही नवीन सीरीज पूर्वीच्या चेतक स्कूटरपेक्षा अधिक प्रगत आणि स्मार्ट बनवली गेली आहे. या स्कूटरमध्ये अनेक नवे आणि आवश्यक फीचर्स समाविष्ट केले गेले आहेत, जे ग्राहकांच्या दररोजच्या वापरासाठी योग्य आहेत.
बॅटरी आणि रेंज
नवीन चेतक 35 सीरीजमध्ये 3.5 kWh क्षमतेचा अंडरफ्लोर बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर स्कूटर 153 किलोमीटरपर्यंत धावू शकते, तर वास्तविक रेंज 125 किलोमीटर असल्याचा दावा बजाज ऑटोने केला आहे. स्कूटरमध्ये 950W ऑनबोर्ड चार्जरची सुविधा आहे, ज्यामुळे बॅटरी फक्त 3 तासात 80% पर्यंत चार्ज होते. स्कूटर सामान्य घरगुती पॉवर सॉकेटशी कनेक्ट करून सहजपणे चार्ज करते.
स्टोरेज आणि फीचर्स
चेतक 35 सीरीजमध्ये वस्तू ठेवण्यासाठी 35 लिटर क्षमतेचं अंडर-सीट स्टोरेज देण्यात आलं आहे. यात अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त बॅग किंवा हेल्मेट देखील ठेवता येते. स्कूटरमध्ये TFT टच स्क्रीन डिस्प्ले आहे, जे इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन्ही म्हणून काम करते. यात इंटिग्रेटेड मॅप, म्युझिक कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल ॲक्सेप्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स देण्यात आलेत. जिओ फेन्सिंग, थेफ्ट अलर्ट, अपघात अलर्ट, स्पीड अलर्ट अशी फीचर्स देखील समाविष्ट केली गेली आहेत.
किंमत आणि व्हेरिएंट्स
नवीन बजाज चेतक 35 सीरीज ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे, ज्यामध्ये दमदार फीचर्स आणि चांगली रेंज आहे. ही स्कूटर त्याच्या स्पर्धकांना कडी टक्कर देण्यासाठी तयार आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंट (3502) ची किंमत 1,20,00 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची (3501) किंमत 1,27,243 रुपये आहे. कंपनीने दोन्ही प्रकारांचे अधिकृत बुकिंग सुरू केलंय.