जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । उन्हाळी हंगाम हा प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण रेल्वेनं बाहेरगावी जाण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये खचाखच गर्दी दिसून येत. उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढचा निर्णय घेतलाय. गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक तसेच गाडी क्र. ०१२१२ नाशिक ते बडनेरा या गाड्यांना ३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक
बडनेरा (सकाळी १०.०५ वाजता), मूर्तिजापूर (सकाळी १०.३० वाजता), बोरगाव सकाळी १०.४८ वाजता, अकोला सकाळी ११.०२ वाजता, शेगाव सकाळी ११.३३ वाजता, नांदुरा (दुपारी १२.०३ वाजता), मलकापूर (दुपारी १२.३८ वाजता), बोदवड (दुपारी १.३७वाजता), भुसावळ (दुपारी ३.० > वाजता), जळगाव (दुपारी ३.३५ वाजता), पाचोरा (दुपारी ४.०५ वाजता), चाळीसगाव (दुपारी ४.३८ वाजता), नांदगाव (दुपारी ५.२० वाजता), मनमाड (दुपारी ५.५० वाजता), लासलगाव (संध्याकाळी ६.०५ वाजता), निफाड (६.२५ वाजता), नाशिक (रात्री ७.५ वा.)