⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | बाबा महाहंस महाराजला अटक, जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा

बाबा महाहंस महाराजला अटक, जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट संस्था आणि कागदपत्र तयार करून जागा हडप केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बाबा महाहंस महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे. यावल पोलीसात बाबाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभाग कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलीस तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज याला पोलिसांनी अटक केली आहे.

वनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.