⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | आयुर्वेद हा जगण्याचा सार – डॉ. केतकी पाटील

आयुर्वेद हा जगण्याचा सार – डॉ. केतकी पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात दिक्षारंभ सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२४ । आयुर्वेदाला तीन हजार वर्षांची परंपरा लाभली आहे. आयुर्वेदात सगळ्यांचे मिश्रण आहे. एकूणच आयुर्वेदामध्ये जगण्याचा सार असल्याचे मत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरचा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. राकेशकुमार मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड आदी उपस्थित होते. दिक्षारंभ सोहळ्याच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी महाविद्यालयाविषयीची माहिती उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना दिली. सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या डॉ. केतकी पाटील पुढे म्हणाल्या की, शिस्त हा गोदावरी परिवाराचा पाया आहे. त्यामुळे पालकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवून त्यांच्या पाल्यांसाठी याठिकाणी प्रवेश घेतला आहे तो विश्वास नक्कीच सार्थ ठरेल. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी वैदीक आणि वैद्यकीय आयुष्य जगतील. विद्यार्थ्यांनी पदवी घेऊन पुणे, मुंबईकडे न जाता जिथे खरी गरज आहे

त्याठिकाणी वैद्यकीय सेवा द्या. आयुर्वेद ही सामाजिक सेवेची पदवी असून आयुर्वेदातच जगण्याचा सार असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. राकेशकुमार मिश्रा, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रातिनीधीक स्वरूपात स्वागत करण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. कोमल खांडरे व डॉ. पालवी चौधरी यांनी केले. तर डॉ. मयूरी चौधरी यांनी धन्वंतरी स्तवन म्हटले.

यांनी केले सहकार्य या सोहळ्यासाठी डॉ. मुकेश चौधरी, डॉ. सुवर्णा खंगार, डॉ. धनके, डॉ. मिनल किनगे, रजीस्ट्रार नितीन पाटील, चेतन चौधरी, मोहीत येवले, जमीर तडवी, हेमंत जंजाळकर, संजय परिस्कर, तेजस राणे, मनोज पाटील यांनी सहकार्य केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.