जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एन एस) विभागातर्फे तरसोद (जळगाव) येथे मानव अधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीद्वारे नागरिकांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली.मानवाचे मूलभूत हक्क, सन्मान आणि सामाजिक न्याय याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तर्सोद परिसरात फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली. रॅलीत १०० हून अधिक (एन एन एस) स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमाच्या माध्यमातून तर्सोदमधील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यात आली आणि समाजामध्ये समानता आणि न्यायाचे महत्त्व पटवून दिले.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणविर, (एन एन एस) समन्वयक प्रा. निम्मी वर्गीस, प्रा. आश्लेषा मून, प्रा. रितेश पडघन व प्राध्यापक मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मानव अधिकार दिनानिमित्त अशी जनजागृती रॅली समाजाला सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.