जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमीत्त जनजागृती करण्यात आली.डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील फिजिओथेरपी ओपीडीत या जागतिक विषयांतर्गत आज फिजिओथेरपी ओपीडीमध्ये मोफत अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस तपासणी व शारीरिक स्थिती मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश अॅक्सिअल स्पॉन्डिलोआर्थ्रायटिस या मणक्यांवर परिणाम करणार्या आणि उपचार न झाल्यास दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणार्या दीर्घकालीन जळजळीच्या आजाराबाबत जागरूकता वाढविणे हा होता. या आजाराचे लवकर निदान व उपचार हे रुग्णांचे आयुष्यमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.या शिबिराचे आयोजन मस्क्युलोस्केलेटल विभागाच्या डॉ. रिया अग्रवाल आणि डॉ. विहा कोठारी यांनी केले होते
तसेच मस्क्युलोस्केलेटल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी व इंटर्न्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण टीमने रुग्णांना अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसबद्दल माहिती दिली व एकूण ५२ रुग्णांची यशस्वी तपासणी करून मोफत स्क्रिनिंग आणि पोस्चर मूल्यांकन केले.या उपक्रमाद्वारे आम्ही सतत पाठदुखी व कडकपणासारख्या लक्षणांसाठी लवकर वैद्यकीय सल्ला देण्यात आला.