⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

निधी फाउंडेशनतर्फे तांड्यावर मासिक पाळी स्वच्छता विषयी जनजागृती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनी राबवला उपक्रम, मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । जागतिक मासिक पाळीदिनानिमित्त सोमवारी जळगावातील निधी फाउंडेशनतर्फे मेहरूण तलाव परिसरात असलेल्या तांड्यावर जनजागृती करण्यात आली. प्रसंगी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व विषद करीत नॅपकीनचे मोफत वितरण करण्यात आले.

जगभरात २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील अनेक भागात विशेषतः ग्रामीण भाग, पाड्यावर आणि तांड्यावर अद्यापही मासिक पाळीविषयी समज-गैरसमज आहेत. मासिक पाळी दिनाचे औचित्य साधत पूर्वसंद्येला मेहरूण तलाव परिसरात असलेल्या तांड्यावर पॅड वुमन वैशाली विसपुते यांनी जनजागृती केली. महिलांना कापडमुक्त अभियानाचे महत्त्व सांगत स्वतःची स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनचे फायदे वैशाली विसपुते यांनी समजावून सांगितले.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त निधी फाउंडेशनतर्फे तांड्यावरील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वितरण करण्यात आले. प्रसंगी हेतल पाटील, जयश्री अहिरे आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.

दरवर्षी २८ तारीखच का?
सर्वप्रथम २०१४ साली ‘वॉश युनायटेड ऑफ जर्मनी’ या संस्थेने ‘मासिक पाळी स्वच्छता दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो. नेमके, हा दिवस निवडण्यामागेही एक कारण आहे. प्रत्येक स्त्रीचे मासिक पाळीच्या दिवसांचे गणित वेगळे असते, पण साधारणतः मासिक पाळीचं चक्र २८ दिवसांचे असते असं जगभरातले डॉक्टर्स आणि वैज्ञानिक मानतात. म्हणूनच मे महिन्यातल्या २८ वा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून वॉश या जर्मनीमधल्या संस्थेने निवडला असावा असा अंदाज आहे.