यंदा रेशीमगाठी बांधण्यासाठी बरेच मुहूर्त; कोणते आहे विवाहाचे शुभ मुहूर्त? जाणून घ्या तारखा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२३ । हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो. कुंडली पाहून लग्नाचा शुभ मुहूर्त काढला जातो. जर मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. साधारणतः तुळशी विवाहानंतर लग्नाच्या धामधूमला सुरुवात होते. त्यानुसार येत्या सोमवार (दि. २७)पासून सनई-चौघडे वाजणार आहेत.
यंदा जुळून आलेल्या रेशीमगाठी बांधण्यासाठी बरेच मुहूर्त आहेत. डिसेंबर २०२३ पासून डिसेंबर २०२४ या काळात ७७ तारखा ग्रह-नक्षत्रानुसार शुभ आहेत. यंदा लग्नाची विक्रमी धामधूम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कार्तिकी एकादशीमध्ये तुळशी विवाह पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराईला सुरुवात होते. यावर्षी ती उशिरा होत आहे. अशात मे आणि जून महिन्यात गुरू आणि शुक्र अस्ताचा अडथळा असल्याने अनेकांची निराशा होऊ शकते. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन मुहूर्त आहेत. त्यांनतर पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये १० मुहूर्त शुभ आहेत.
नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी ते एप्रिलपर्यंत भरपूर मुहूर्त आहेत. या चार महिन्यात विवाहासाठी ४२ शुभ तारखा आहेत. मे आणि जून महिन्यात मात्र लग्नाळुंची निराशा होऊ शकते. गुरू आणि शुक्र अस्ताचा दोष या मुहूर्तांवर आहेत. या काळात विवाह करणे अनिर्वाचीत असेल तर कोणत्याही तारखेला न करता योग्य तिथी व नक्षत्राचा विचार करून तो करावा. अशांसाठी मे महिन्यात १४ आणि जून महिन्यातही १४ मुहूर्त आहेत.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर २०२३ : २७, २८, २९
डिसेंबर २०२३ : ६, ७, ८, १४, १५, १७, २०, २१, २५, २९ २०२४ मध्ये
जानेवारी : २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी : १, ४, ६, १२, १३, १४, १७, १८, २६, २७, २८, २९
मार्च : ३, ४, ६, ११, १६, १७, २६, २७, ३०
एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २३
जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५
नोव्हेंबर : १७, २३, २६, २७
डिसेंबर : ३, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २६