---Advertisement---
जळगाव जिल्हा

मंत्री गुलाबराव पाटलांची कार्यकर्त्याला शिविगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । एकीकडे मराठा आरक्षणाचा पुन्हा ऐरणीवर आला असून जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप (Audio clip Viral) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

GP audio clip jpg webp webp

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना कार्यकर्त्याने गुलाबरावांना जुलाबराव म्हटल्यामुळे मंत्री गुलाबराव चांगलेच भडकले. त्यांनी थेट कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ करत त्याचा उद्धार केल्याचं समोर आलं आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. मात्र, ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ या कथित ऑडिओ क्लिपला कोणताही दुजोरा देत नाही.

---Advertisement---

या ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्त्याकडून मंत्री गुलाबराव पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून वादावादी होताच कार्यकर्त्याने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी जुलाबराव असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच भडकले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी या कार्यकर्त्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याला आईवरूनही शिवीगाळ केली. गुलाबरावांनी शिवीगाळ केल्यावर कार्यकर्त्याकडूनही गुलाबराव पाटलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसतं.

दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दोघांचेही फोटो दिसत आहेत. फोटो असलेल्या कार्यकर्त्याचे नाव रमेश पाटील आहे. तर दुसऱ्या बाजूने मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो दिसत आहे. दरम्यान ऑडिओ क्लिपवरून जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या औरंगाबाद येथील व्यक्तीसह ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे धरणगाव येथील दोन जण अशा तिघांविरुद्ध काल धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/2436264439889999

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---